पन्हाळा हळहळला ! विजेच्या धक्क्याने मायलेकराचा मृत्यू
schedule29 Jun 23 person by visibility 2980 category
पन्हाळा : आज आषाढी एकादशी दिवशी पन्हाळा तालुक्यातून एक दुःखद घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. पन्हाळा तालुक्यातील नेबापूर हद्दीत तुटलेल्या विजेच्या तारांचा स्पर्श होऊन मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे आणि तुटलेल्या विजेच्या तारांकडे वेळीच लक्ष न दिल्यामुळे या दोघांचा बळी गेल्यामुळे लोकांमधून संतापाची प्रतिक्रिया येत आहे. त्याचबरोबर त्या मायलेकराबद्दल नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. सदर घटनेची सखोल चौकशी होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लेकाला वाचविताना आईचा ही अंत
अजिंक्य हा सकाळी सात च्या सुमारास स्वमालकीच्या शेतात मशागतीची कामं करण्यासाठी गेला होता. वेळ झाला म्हणून आई मुलाला बघण्यासाठी शेतात गेली त्यावेळी हातात विद्युत तार पकडलेल्या अवस्थेत मुलगा अजिंक्य निपचित पडलेला दिसला. घाबरून आईने धावत जाऊन मुलाला स्पर्श करताच तिला सुद्धा विजेचा जोरदार धक्का बसला आणि ती ही गतप्राण झाली. आजूबाजूला असणाºया शेतकºयांनी आरडाओरडा केल्याने घटना कळली. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पन्हाळा पोलीसांत या घटनेची नोंद आहे.